आमची उत्पादने
गूळ निर्मिती उद्योगासाठी लागणारे संपूर्ण साहित्य, 1955 पासून आधुनिक पद्धतीने घडवलेले.
गुळाची काईल
आधुनिक स्टिअरिंग गाड्यासह सहज उचलता येणारी, दर्जेदार लोखंडापासून हाताने घडवलेली काईल.
काईल वाहण्याचा गाडा
स्क्रू-जॅक स्टिअरिंग यंत्रणेमुळे काईल केवळ पाच-सहा जणांत सहज वाहून नेता येते.
पट्टी (काटाळी)
काईलच्या तळाला आधार देणारी पट्टी — एका पट्टीवर तीन तळ चालू शकतात.
भट्टी चिमणी व सरपण हॉपर
भट्टीचा धूर योग्य दिशेने बाहेर टाकणारी व जळण भरणे सोपे करणारी चिमणी-हॉपर रचना.
रसाचा हौदा (मनदन)
गुऱ्हाळातील रस साठवणे व मळी वेगळी करण्यासाठी लागणारे पारंपरिक साहित्य.
माळी फिल्टर स्टॅन्ड
रसाची मळी गाळून उरलेला चांगला रस पुन्हा काईलमध्ये नेण्यासाठी वापरले जाते.
घमी (Ghami)
गुऱ्हाळासाठी लागणारी पारंपरिक व टिकाऊ घडणीची घमी.
फ्यांजिस (टोपण)
शिजलेला गुळ काईलमधून ओफ्यात घेण्यासाठी वापरले जाणारे टोपण.
काईल तळ मारणे व उडदाचे पीठ लावणे
नवीन तळ गळू नये म्हणून उडदाचे पीठ लावण्याची पारंपरिक व अचूक पद्धत.
प्रसादासाठी लागणारी काईल
खीर बनवण्यासाठी योग्य आकाराची, प्रसादासाठी खास तयार केलेली छोटी काईल.